5,347 पदांची महाराष्ट्रात पर्मनंट मेगा भरती | mahaaraashtr raajy vidyut vitaran kampanee mein 5347 mega bharatee
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित
जाहिरात क्रमांक ०६/२०२३
दिनांक : २९/१२/२०२३
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील "विद्युत सहाय्यक" पदाची वेतनगट - ४ मधील विभागस्तरीय सेवाज्येष्ठतेतील पदे सरळसेवा भरतीद्वारे ०३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑन लाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. "विद्युत सहाय्यक" या पदाचा ०३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना "तंत्रज्ञ" या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.
वेकेंसी के बारेमे जानकारी
| विभागाचे नाव | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण |
| कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
| वयोमर्यादा | १८ ते २७ वर्षापर्यंत |
| कोण अर्ज करू शकतात | ऑल इंडिया उमेदवार |
| अनुभव | फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात |
| Gender Eligibility | Male and Female |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| शैक्षणिक पात्रता | (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. |
वेकेंसी बदल माहिती
| वेतन | २५,८८० ते ५०,८३५ |
| अर्ज फी | खुला प्रवर्ग - २५०/-, राखीव प्रवर्ग - १२५/- |
| नोकरीचे प्रकार | कंत्राटी नोकरी (३ वर्षे) नंतर पर्मनंट केले जाईल. |
| निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा (IBPS) |
| Apply Start Date | ०१ मार्च २०२४ |
| Apply Last Date | २० मार्च २०२४ |
| अधिकृत वेबसाईट | www.tropmet.res.in |
| Apply Online | Click Here |
| Notification | Click Here |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
| जागा | ५,३४७ जागा |
| पदाचे नाव | विद्युत सहायक |
रिक्त पदांचा गोषवारा :
| प्रवर्ग | अ.जा. | अ.ज. | वि.जा.(अ) | भ.ज.(ब) | भ.ज.(क) | भ.ज.(ड) | वि.मा.प्र. | इ.मा.व. | आ.दु.घ. | खुला | एकूण पदे |
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| पदसंख्या | ६७३ | ४९१ | १५० | १४५ | १९६ | १०८ | १०८ | ८९५ | ५०० | २०८१ | ५३४७ |
रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक/समांतर आरक्षणाचे विवरणपत्र
दिनांक २९/१२/२०२३ अखेर शैक्षणिक अर्हता :-
१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
आणि
२) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री/ तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
दिनांक २९/१२/२०२३ अखेर वयोमर्यादा :-
१) उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे पूर्ण व कमाल वय २७ वर्षे असणे आवश्यक आहे.
२) मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ई.डब्ल्यू.एस.) उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ५ वर्षे शिथिलक्षम राहील.
३) दिव्यांग उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.
४) माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही ४५ वर्षाची राहील.
मानधन :-
निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमहा मानधन देण्यात येईल.
अ) प्रथम वर्ष - एकूण मानधन रुपये १५,०००/-
ब) द्वितीय वर्ष - एकूण मानधन रुपये १६,०००/-
क) तृतीय वर्ष - एकूण मानधन रुपये १७,०००/-
उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजावट करण्यात येईल. भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल.
"विद्युत सहाय्यक" या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना "तंत्रज्ञ" या नियमीत पदावर रु. २५८८०-५०५-२८४०५-६१०-३४५०५-७१०- ५०८३५ या वेतनश्रेणीमध्ये घेण्यात येईल.
निवड पध्दती :
१) अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरुपाची (Objective Type) ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल, सदर चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेले किमान अर्हता, सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणा-या ज्ञानावर आधारीत राहोल, परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी राहोल, ऑन लाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरीता बोलविण्यात येईल,
२) उमेदवारांनी सादर केलल्या अर्जाची छाननी व त्यांच्या पात्रतेची पडताळणी ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणी होण्यापूर्वी केली जाणार नाही. त्यामुळे परीक्षेला बोलविले म्हणजे उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही, तथापि, निवड झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी नेमणुकीपूर्वी करण्यात येईल, ऑन लाईन अर्जामध्ये दर्शविलेल्या माहितीपृष्ठयर्थ योग्य ते दस्तऐवज जमा करणे ही सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी राहील, अन्यथा त्याची निवड रद्द करण्यात येईल,
३) ऑन लाईन परीक्षा ही सदर पदाकरीता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता (Educational Qualification) व सामान्य अभियोग्यता चाचणी (General Aptitude) यावर आधारीत राहील. ऑन लाईन परीक्षेचे स्वरुप खालीलप्रमाणे राहील:-


